अमळनेर मुस्लिम पंच मंडळीनी घेतला निर्णय, पोलिस प्रशासनाला दिले निवेदन…
अमळनेर:- दिनांक २८ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने त्यादिवशी येणारा ईद ए मिलाद सण २९ रोजी साजरा करण्याचा निर्णय अमळनेर मुस्लिम पंच कमिटीने घेतला असून जुलूस काढण्याची परवानगी मिळण्याबाबत अमळनेर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
दिनांक १६ सप्टेंबर रोजी चंद्र दर्शन झाल्याने ईद ए मिलाद दिनांक २८ रोजी येणार होता. अमळनेर पोलीसांकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे शहरातील सर्व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व पंच यांनी बैठक घेतली. २८ रोजी अनंत चतुर्दशी हा महत्वाचा सण असल्याने मोठया प्रमाणावर गणेश विसर्जनासाठी गर्दी होते. त्यामूळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना बंदोबस्तासाठी मदत व्हावी म्हणून सर्व मुस्लिम समाजाने एकमताने निर्णय घेत दिनांक २९ रोजी ईद ए मिलाद साजरी करून त्यादिवशी जुलूस काढणार असल्याबाबत लेखी निवेदन दिले आहे शहरातील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नसीर हाजी शेख, हाजी शब्बीर पहलवान, फिरोज पठाण (मिस्त्री), आरीफ भाया, मुख्तार खाटीक, इम्रान खाटिक, रियाज़ शेख, इकबाल शेख, मुस्ताक मूजावार, इमरान खाटीक आदींनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना सदर निवेदन दिले.