पिंपळे रोड परिसरातील शंकर नगर नवरात्रोत्सव मंडळाचे यंदा ३२वे वर्ष…
अमळनेर:- शहरातील पिंपळे रस्त्यावरील शंकर नगर परिसरात घटस्थापना झाली असून या निमित्ताने दररोज गरबा, नृत्य व अनेक कार्यक्रम रंगत आहेत.
मंडळाने मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील गायत्री आर्ट मधून देवीची सुंदर व सुबक मूर्ती आणली आहे. या वर्षी मंडळाचे ३२ वे वर्ष आहे. यात पिंपळे रोड परिसरातील सर्व नागरिक उस्फुर्तपणे सहभाग देत आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप सुभाष सोनवणे, उपाध्यक्ष गौरव धनंजय पाटील, खजिनदार शुभम संदीप बोरसे, सह खजिनदार जयेश महिंद, समाधान देशमुख, पंकज सनेर, जालंदर चौधरी, दिनेश सनेर, गोरख चौधरी व सर्व भाविक परिश्रम घेत आहेत.