ईदगाह मैदानात नमाज अदा करत काढली मिरवणूक…
अमळनेर:- पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून ईदगाह मैदानात नमाज अदा केली, यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ईद-ए-मिलाद 28 तारखेला होणार होती, मात्र त्याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने शहरातील मुस्लिम नागरिकांनी औदार्य दाखवत मिरवणूक काढण्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 29 रोजी मुस्लीम लोकांनी मिरवणूक काढली, त्यात कसाली मोहल्ला, जुम्मा ची नमाज अदा केल्यानंतर शाहआलम नगर, इस्लामपुरा, अंदर पुरा, बाहेर पुरा, झामी चौक, मिलचाल, जपान जिन आदी ठिकाणच्या मुस्लिमांनी मिरवणूक काढली. गलवाड़े चाळ, बंगाली फाईल आदी ठिकाणांहून 3 वाजता कसाली परिसरातून मिरवणूक काढण्यात आली , यामध्ये तरुण आणि लहान मुलांचा समावेश होता. सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता. सर्व लोक हातात झेंडे घेऊन ईदगाहकडे निघाले होते सर्वांनी असर ची नमाज अदा केली. सुमारे पाच ते सात हजार लोक मिरवणुकीत सामील झाले, यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.
मिरवणुकीचे पुष्पविसर्जन करून स्वागत…
अमळनेर शहरात जश्ने ईद- ए- मिलादुन्नबीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांचा जुलुस ( मिरवणूक) काल दि 29 रोजी काढण्यात आला. दुपारी 2 वा. कसाली मोहल्ला,आखाडा मकान येथून मिरवणुकीस सुरुवात झाली.सदर मिरवणूक दगडी दरवाजा जवळ पोहोचल्यावर अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने मिरवणुकीवर फुल व पाकळ्यांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.पोलीस प्रशासन व मुस्लिम समाज बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक केले.