अमळनेर:- तालुक्यात काल ११ कोरोना बाधीत आढळले असून यात १० रुग्ण शहरात व १ रुग्ण ग्रामीण भागात आढळून आला आहे.
कृषी नगर १, गोदावरी नगर ( ढेकू रोड) २, पैलाड २, प्रताप मिल १, त्रिकोणी बगीचा १, केशव नगर १, मुक्ताई वाडी ( ढेकू रोड) १, भागवत रोड १, व तालुक्यातील धार येथे १ रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात २१ रोजी कोविड लसीकरण सुरू असून कोविशिल्ड लसीचे ५०० डोस उपलब्ध आहेत.