
अमळनेर:- अमळनेर तालुक्यात काल एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून बाधीत रुग्णांच्या संख्येत घट होत असून पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अमळनेर तालुक्यात कोरोना बाधीत आढळून आले नाही. आता तालुक्यात संसर्ग कमी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव व तीव्रता कमी होत असल्याचे दिसून येत आहे.