
परीक्षा पे चर्चा उपक्रमात भाग घेत विचार मांडल्याबद्दल केले कौतुक…
अमळनेर:- येथील साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थी प्रणव मोरे याला परीक्षा पे चर्चा उपक्रमात सहभाग घेत विचार मांडल्याबद्दल त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र प्राप्त झाले आहे.

इयत्ता दहावी शिकत असलेल्या प्रणव सुधीर मोरे याने परीक्षा पे चर्चा या उपक्रमात भाग घेत ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा दिली होती. त्यांनतर दिनांक २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकास्पद पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्रात “माझे आर्शिवाद तुमच्या पाठीशी असून आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारख्या तरुणांचे विचार जाणून घेणे व समजून घेणे नेहमीच प्रोत्साहन देणारे ठरते. तसेच आपण आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत आपण यशस्वी व्हाल, असा आशावाद नमूद केला आहे. तसेच देशाच्या भविष्यकाळासाठी विविध विचार या पत्रात मांडले आहेत. प्रणव सुधिर मोरे याला शिक्षक डी ए धनगर, मुख्याध्यापक सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतर विद्यार्थ्यांना त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. तो मारवड येथील सी वाय साळुंखे यांचा नातू असून पुढील काळात प्रणव स्वतंत्रपणे विचार मांडून आपली भूमिका मांडण्यासाठी सक्षम होईल असा आशावाद परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.




