
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळील रस्त्यावर एका वाहनात गुरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी शिरपूर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोकॉ.राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता टाकरखेडा गावाजवळील रस्त्यावर एका वाहनात २५ हजार रुपये किमतीची ३ जनावरे (एम एच १८ बी झेड ४२३४) जाबीर शेख मेहमूद शेख (वय ३४), दानिश शेख कलीम शेख (वय २३) दोघे राहणार गणेश कॉलनी शिरपूर हे गुरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नसतांना निर्दयीपणे वाहतूक करून घेऊन जात होते.प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ सुनील जाधव करत आहेत.




