
अमळनेर – १८ वर्षीय तरुणी घरी एकटी असताना बळजबरी घरात घुसून विनयभंग केल्याची तालुक्यातील करणखेडा येथे घडली आहे.

२० रोजी रात्री दहा वाजता १८ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना धीरज अनिल पाटील हा बळजबरी घरात घुसला. तसेच तरुणीचे तोंड दाबून शिवीगाळ करत आरडाओरड केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.त्यावेळी तरुणीला लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी स्पर्श केल्याने तरुणीने आरडाओरड केली असता गल्लीतले लोक धावून आले व त्यांना धीरज हा घरात मिळून आला. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून धीरज अनिल पाटील याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.




