आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण करत उपाययोजना करण्यास सुरुवात…
अमळनेर:- शहरात आणखी चार तर ग्रामीण भागात एक असे पाच डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य पथकातर्फे सर्वे करून कंटेनर खाली करण्यात येत आहेत.
गेल्या तीन दिवसात गांधलीपुरा मेहतर कॉलनी भागात २२ वर्षीय तरुण, ओम शांतीनगर भागातील १७ वर्षीय तरुणी, पटवारी कॉलनीतील १६ वर्षीय युवक, अमलेश्वर नगर भागातील २२ वर्षीय तरुण आणि तासखेडा येथील सहा वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाली आहे. अमळनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी आणि नगरपालिकेचे डॉ विलास महाजन यांनी शहरातील रुग्ण आढळलेल्या भागात आशा स्वयंसेविका, परिचारक व आरोग्य सेवक यांच्या पथकाकडून सर्वेक्षण सुरू केले आहे. सार्वजनिक ठिकाणी डबके, घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाक्या, हौद, फ्रीजचे भांडे , टायर, कुलर, छतावरील साचलेले पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. अनेक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. घरातील सदोष भांडे रिकामे करण्यात आले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणची डबके जेथे पाणी काढता येत नाही त्या ठिकाणी ऑइल टाकण्यात आले आहेत.