अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील ३६ वर्षीय इसम अमळनेर येथून बेपत्ता झाला असून भावाच्या तक्रारीवरून मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
तांदळी येथील अरविंद गुलाबराव पाटील (वय ३६) हा दिंडोरी येथे काम करत असून दिनांक ८ रोजी तो तांदळी येथे आला. ९ रोजी सकाळी तो अमळनेर येथे बँकेचे काम करून येतो असे सांगून घरातून निघाला. मात्र सायंकाळ झाली तरी तो परत न आल्याने त्याला फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यानतंर नातेवाईक व परिसरात शोध घेतला असता तो मिळून न आल्याने गोपाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण व हेकॉ सचिन निकम करित आहेत.