अमळनेर:- शहरातील डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मा. प्राचार्य ज्योती राणे यांनी प्रतिमा पूजन केले. डॉ.कलाम यांनी देशासाठी केलेल्या कार्यावर बोलताना वैज्ञानिक डॉ. कलाम हे विद्यार्थ्यांसाठी नाही तर समाजासाठी देखील प्रेरणा देणारे असून मिसाईल मॅन म्हणून त्यांची जगात ओळख तसेच त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा दाखला दिला. आजचा दिवस शाळेत जागतिक विद्यार्थी दिन म्हणून वाचन दिवस देखील साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जाधव, संस्थेचे अध्यक्ष चेतन जाधव, सोबत डॉ. नरेंद्र जाधव, विजय बडगुजर, श्याम भावसार तसेच शाळेतील शिक्षक निकिता बोरसे, स्मिता पाटील, विनोद पवार यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांचे आभार शिक्षिका प्रतीक्षा पाटील यांनी मानले.