अमळनेर:- खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे भूगोलशास्त्र विभाग अंतर्गत १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
भूगोल विषयाचे एकूण ५० शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक डॉ. नंदकुमार सावंत (गोवा), संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. सुधाकर परदेशी (पुणे), डॉ. प्रकाश कोंका (बीड) आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन सत्र श्री राणे सभागृह आणि समारोप सत्र पूज्य साने गुरुजी सभागृहात संपन्न होणार आहे. शोधनिबंधाचे सादरीकरण दुसऱ्या सत्रात दोन्ही सभागृहात सुरु असेल. अधिकाधिक सहभागाचे आवाहन खा.शि. मंडळाचे सर्व पदाधिकारी, मा. प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व संयोजकांनी केले आहे.