
अमळनेर येथील बाजार समिती आवारात पार पडल्या निवड चाचणी स्पर्धां…
अमळनेर:- जळगाव जिल्हा कुस्ती निवड चाचणीत जिल्ह्यातील २० पैलवानांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या निवड चाचणी स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.

जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख व अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळू पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गादी आखाड्याचे पूजन बाजार समिती सभापती अशोक पाटील व माती आखाड्याचे पूजन मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे अक्षय अग्रवाल, तालुका क्रीडा अधिकारी, संचालक समाधान धनगर, विजय पाटील, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ हजर होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते विजयी पैलवानांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे- माती गट मोहसीन मुल्ला (चाळीसगाव ६१ किलो गट), संदीप कंखरे (धरणगाव ५७ कि) , राज वाकोडे (भडगाव ६५ कि), अनिल पवार (चाळीसगाव ७० कि), समाधान पाटील (पारोळा ७४ कि), धनंजय सरोदे (चाळीसगाव ७९ कि), समाधान पाटील (एरंडोल ८६ कि), अजिंक्य माळी (चाळीसगाव ९२ कि), प्रवीण बच्छाव (चाळीसगाव ९७ कि), गोपाल जानी (चाळीसगाव १२५ कि)
गादी गट- यशवन्त बोरसे (जळगाव ५७ कि), यश अरुण मराठे (जळगाव ६१ कि) ,सुमित पाटील (एरंडोल ६५ कि) ,कल्पेश पाटील (भडगाव ७० कि), वैभव सोनवणे (जामनेर ७४ कि) ,शेख नासिर याकूब ( सायगाव ७९ कि), योगेश बैरागी (चाळीसगाव ८६ कि), हितेश पाटील (पाचोरा ९२ कि), राजेंद्र भोई (पाचोरा ९७ कि), भावेश पाटील (चाळीसगाव १२५ कि)
स्पर्धेत २०० खेळाडू सहभागी झाले होते. पंच म्हणून विलास भोसले , विजय मराठे , पी पी पाटील, दिलीप संघेले, गुलाब चव्हाण ,मंगलसिंग पवार, एस के पाटील,प्रशांत पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक समिती सुनील देशमुख संजय महाजन, संजय पाटील, अजय देशमुख, भानुदास आरके, तसेच बाळू पाटील, संजय पाटील, शब्बीर पैलवान, संजय भिला पाटील, प्रताप शिंपी, मुख्तार खाटीक रावसाहेब पाटील, भरत पवार, प्रवीण पाटील, हरीश शेळके, प्रशांत पाटील, विशाल महाजन, आप्पा पाटील,हसन पैलवान यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन एस पी वाघ यांनी तर आभार सुनील देशमुख यांनी मानले.



