
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील शेतकी संघाच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १५ जागांसाठी १६२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मागील अनेक वर्षापासून शेतकी संघावर प्रशासक राज असल्याने निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
शेतकी संघाचा निवडणूक कार्यकम:- २७ एप्रिल ते ४ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे,५ मे रोजी छाननी,६ मे ते २० मे माघार ,२१ मे रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी जाहीर करणे,३० मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी असणार आहे.
शेतकी संघाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून यात व्यतिश मतदार संघ (५),सोसायटी मतदार संघ (५),महिला राखीव (२), इमाव (१), एस.सी./एस. टी.(१), एन.टी.(१) अशा जागा आहेत.
सर्वच मतदार संघात तालुक्यातील दिग्गज उमेदवारांनी फॉर्म भरले असल्याने उमेदवारी दाखल अर्जांची संख्या १६२ वर जाऊन पोहोचली आहे,आता माघारिकडे लक्ष लागले असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.




