
अमळनेर : येथील सानेनगर मधील रहिवासी आणि शहरातील पैलाड भागातील जावाई संजय केशव पाटील तिसऱ्यांदा सुरत येथील प्रमुख लिंबायत भागात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. खान्देशाचा आणि अमळनेरचा ठसा त्यांनी गुजरात मध्ये उमटवला आहे.

लिंबायत च्या आमदार संगीता पाटील आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या सहकार्याने संजय केशव पाटील यांनी १९९४ मध्ये लिंबायत मध्ये भाजप युवा प्रमुख पद सांभाळले, १९९७ मध्ये त्यांना सुरत शहर युवा मोर्चाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. २००० मध्ये युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तर २००५ ते २०१० च्या कालावधीत नगरसेवक व आरोग्य सभापती, स्थायी समिती सदस्य, नगरनियोजन समितीचे व्हॉ चेअरमन अशी प्रमुख जबाबदारीची पदे सांभाळली. २०१७ मध्ये उमरगाव विधानसभेचे पूर्णकालीन विस्तारक म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. २०२१-२६ कालावधीत शिक्षण समिती सदस्य आणि स्पोर्टस कमिटी ,टूर उद्योग चेअरमन पदे भूषवली. पुन्हा २८ एप्रिल २०२६ रोजी ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
संजय पाटील हे सानेनगर मधील रहिवासी आहेत तर पैलाड येथील पंढरीनाथ तानचंद देवरे यांचे जावई असल्याने अमळनेर शहरात दोन्ही भागात आनंद पसरला आहे. खान्देशातील व्यक्ती गुजरात मध्ये सत्तेत राजकारण करत असल्याने भूषणावह बाब असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




