
गुणवंतांनी नावे पाठवण्याचे आयोजकांनी केले आवाहन…
अमळनेर:- दिनांक ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिनी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनी तालुक्यातील बौद्ध समाजातील गुणवंतांचा सन्मान होणार असून त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले असते त्यांचे अनेक ठिकाणी सन्मान देखील होत असतात. त्याचप्रमाणे त्यांचा त्यांच्या समाजाकडूनही सन्मान व्हावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात 10वी व 12वी वर्गात 70 किंवा 70 पेक्षा जास्त टक्के मिळवलेले विद्यार्थी, इतर कुठल्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, चांगल्या गुणांनी व्यावसायिक पदवी मिळवलेले विद्यार्थी, मागील 2 वर्षात नोकरीला लागलेले विद्यार्थी व स्वतःचा व्यवसाय उभा केलेले तरुण अशांचा सन्मान होणार असून त्यांनी आपली नावे 7796112894 व 9284615026 या क्रमांकांवर लवकरात लवकर पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.




