अमळनेर:- येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे, अनिल भुसारे, गोपनीय शाखेचे अंमलदार डॉ. शरद पाटील, पो.कॉ. योगेश महाजन, श्रीराम पाटील, मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले.
यावेळी श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवता, मंगळेश्वरी श्री भूमीमाता, श्री पंचमुखी हनुमान यांच्याही मूर्ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. मंदिरासमोरील सभामंडपात आदिशक्ती दुगार्माता महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करीत असल्याची प्रतिमा तसेच पूजेसाठी शमी व आपट्याच्या पानांसह विविध शस्त्रे आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती. दुगार्मातेची ही प्रतिमा मंदिरात आलेल्या भाविकांसाठी आकर्षण ठरली. अनेक भाविकांनी या प्रतिमेसह फोटो व सेल्फी काढले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर,सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्थ अनिल अहिरराव, सेवेकरी प्रकाश मेखा, उज्ज्वला शहा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.