अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला…
अमळनेर:- शहरातील मेघनगरी येथील डीपी व ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस काटेरी झुडुपाना अचानक आग लागली. तसेच मेघनगरीजवळ देखील अचानक डी पी ला आग लागल्याने केबल ब्लास्ट झाली. डी पी जवळ काडी कचरा पडलेला असल्याने पेट घेतला होता. वीज पुरवठा अर्धा ते एक तास खंडित झाला होता. अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, आंनदा झिम्बल, मच्छिन्द्र चौधरी, आकाश बाविस्कर यांनी दोन्ही ठिकाणी वेळीच आग विझवली.