
नवे भक्तनिवास व पादचारी पूल होणार भक्तांसाठी खुले, तिन्ही मंत्र्यांची राहणार उपस्थिती…
अमळनेर:- तालुक्यातील नीम जवळील श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान मध्ये नवीन भक्त निवास, कपिलेश्वर पादचारी पूल आणि स्वामी हंसानंद घाट ही कामे पूर्णत्वास आल्याने या विकासकामांचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 29 रोजी पार पडणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तर पादचारी पुलाचे लोकार्पण ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन, भक्त निवासाचे लोकार्पण मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील व स्वामी हंसानंद घाटचे लोकार्पण माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने नवे भक्तनिवास खुले होणार असल्याने भाविकांसाठी ते वरदान ठरणार आहे. सदर कार्यक्रम दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता निम कपिलेश्वर रस्त्यावर गोशाळा व भक्त निवासाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून खा.उन्मेष पाटील, माजी खा.डॉ.सुभाष भामरे, धुळ्याचे आ.कुणाल पाटील, माजी आ.स्मिता वाघ, आ.सत्यजित तांबे, शिरपूरचे आ.काशीराम पावरा, जळगावचे आ.राजू मामा भोळे, माजी खा.वसंतराव मोरे, माजी आ.डॉ.बी.एस.पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सह असंख्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कपिलेश्वर मंदिर संस्थानचे मठाधिपती तथा अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी हंसानंदतीर्थ महाराज, उपाध्यक्ष सी.एस.पाटील, सचिव राजेंद्र महाजन, खजिनदार छोटू पाटील, सहसचिव तुकाराम चौधरी यासह सर्व विश्वस्थ तसेच मंदिर परिसरातील भाविक भक्तगण व सेवेकऱ्यांनी केले आहे.



