
पोलीस व होमगार्ड बांधवांचा केला सन्मान, प्रविण पाटील मित्र परिवाराचे यशस्वी आयोजन…
अमळनेर:- शहरातील विद्या विहार कॉलनीत नवरात्रीत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण रमेश पाटील व मित्र परिवाराच्या वतीने नवरात्रीत रोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवीध सण उत्सवात कुटुंबापासून दूर राहत जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या होमगार्ड बांधवांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सामाजिक कार्यासोबत धार्मिक उपक्रमाचे आयोजन करत अष्टमीला होमहवन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पाच जोडप्यांनी होमहवन पूजेत सहभाग घेतला. यावेळी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सपत्नीक हजेरी लावत आरतीचा लाभ घेतला तसेच महिलांना रुद्राक्षाचे वाटप केले. यावेळी झालेल्या स्पर्धेत लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढून परिसरातील विजेत्या महिला सदस्यांना पैठणी वाटप करण्यात आली. नवरात्रोत्सवात माजी जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्याहस्ते आरती करण्यात येवून महिला मंडळाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेवक राजेश पाटील, मा.नगरसेवक विनोद कदम, विक्की जाधव, एक दिवस सर्व महिला सामूहिक, एक दिवस सर्व मंडळ पदाधिकारी यांनी सामूहिक आरती केली. नवमीच्या दिवशी नवदुर्गाचा सन्मान करण्यात येवून त्यांना भेटवस्तू, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देण्यात आले. मंडळाच्या वतीने गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
गरबा उत्सव यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक प्रविण रमेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष जयंत बापूराव पाटील, उपाध्यक्ष योगेश मधुकर शिरसाठ, सचिव मोहीत राजेंद्र पवार, सदस्य सागर दगडू विसपुते, विजय येवले, अमोल दुसाने, दिनेश पाटील, भूषण पाटील, संजय पाटकरी, प्रशांत देसाई, किरण अहिरे, कविश पाटील, विवेक पाटील, सनी पाटील, राज सोनवणे यांनी प्रयत्न केले, यावेळी विशेष उपस्थिती ईश्वर महाजन, ग्रामसेवक मिलिंद संदानशिव, ग्रामसेवक नितीन पाटील, आर.डी. शिंदे, शांताराम पाटील, प्रमोद पवार, ललीत चौधरी, संजय पोपट पाटील, रघूनाथ पाटील, विकास शेलकर, सिसोदे भाऊसाहेब, आबा चौधरी सह विदयाविहार कॉलनी मित्र परिवार, संत गजानन महाराज परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नऊ दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने विद्या विहार कॉलनी परिसरात चैतन्यमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्र उत्सव आयोजक प्रवीण रमेश पाटील यांनी मंडळ आणि रहिवाश्यांच्या सहभागातून यशस्वी रित्या या उपक्रमाचे आयोजन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.



