
दुचाकीस्वार जखमी गंभीर, पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे रोडवर चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दिनांक २४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गलवाडे रोडवरील केसरी हॉटेल जवळ पृथ्वीराज गुजर (वय ५१) हे आपल्या दुचाकीने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून येणाऱ्या एमएच १५ बीएक्स १७८० या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यामुळे पृथ्वीराज गुजर यांच्या डोक्याला, पायाला, कंबरेवर मार बसला असून दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. छोटीबाई गुजर यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




