अमळनेर:- येथील जपानजीन परिसरात राहणारी विजयाबाई (वय ६०) हीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बाहेरून कुलूप असलेल्या घरात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे पथक तेथे पोहचले.
पुढच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप आणि मागच्या दरवाज्याला आतून कडी अशा स्थितीत महिलेचे प्रेत कुजले होते. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने ही घटना उघडकीस आली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.