अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथे बोरी नदी काठालगत असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर मारवड पोलिसांनी छापा टाकून भट्टी उध्वस्त करत एकास ताब्यात घेतले आहे.
मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी पोकॉ राजेंद्र पाटील, पोना सुनील तेली, व होमगार्ड यांना बोहरा येथे रवाना केले. त्यांनी बोरी नदीकाठी छापा टाकला असता हिरामण भील (वय ७२) हा दारू तयार करताना मिळून आला. त्याच्याकडून ३०० लिटर कच्चे रसायन, ३० लिटर तयार दारू यासह इतर साहित्य मिळून आले. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत