
अमळनेर:- जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती. किरण कुवर यांची नियुक्ती झाली असून नवनियुक्त शिक्षणाधिकारी यांचा सत्कार जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केला.

यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे परदेशी, तडवी, मारवड हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रा.संजय बागुल आणि लिपिक महेश पाटील यांनी शाल श्रीफळ बुके देऊन केला. जळगाव जिल्हा संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष जयंतराव मन्साराम पाटील यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. सत्काराला उत्तर देताना शिक्षणाधिकारी किरण कुवर मॅडम म्हणाल्या की, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील, असे सांगितले.

