अमळनेर:- खुनाच्या प्रयत्नातील अमळनेर येथील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सनी सुरेंद्र अभंगे (वय २८, रा. चोपडा रोड अमळनेर) याच्यावर अमळनेर पोलिसात भादंवि क. ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ असा गुन्हा दाखल असून तो घटना घडल्यापासून फरार होता. तो शहरात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोह राजेश मेंढे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे यांचे पथक पाठविले. या पथकाने जाऊन त्यास शिताफीने पकडत ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.