अमळनेर:- येथील पु.सानेगुरुजी नगरपालिका वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह.पतपेढी मर्या. अमळनेर या पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासदांना (व्ही आय पी बॅग, इस्त्री, गॅस शेगडी )व मिठाई इत्यादी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे यांच्या हस्ते सदर भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद लटपटे,व्हा.चेअरमन सलीम खा पठाण तसेच संचालक ईश्वरलाल पाटील,गणेश बोरोले, मनोज शर्मा, शेखर देशमुख, सोमचंद संदानशिव, फिरोज पठाण, श्रीमती.राधा नेतले, श्रीमती पूजा उपासनी व सचिव नंदू कुलकर्णी आणि संस्थेचे सभासद नितीन खैरनार,रवींद्र उदेवाल,गणेश जाधव,प्रसाद पाटील, भाऊसाहेब सावंत, फारूक उस्मान, कमरुद्दीन शेख, गणेश शिंगारे, श्रीमती कल्पना मराठे, बी.के.कोळी, शिवाजी कोळी, गुलाब माळी, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.