अमळनेर:- येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेनिमित्त भव्य बळीराजा गौरव मिरवणूक “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” या जयघोषात मोठया उत्साहात संपन्न झाली.
पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शिरुड नाका येथून महात्मा बळीराजा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बाजार समिती सभापती अशोक पाटील, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील,माजी नगरसेवक विक्रांत पाटील, बाळासाहेब कदम,राजेश पाटील, शरद पाटील, प्रा डॉ लिलाधर पाटील, दिलीप पाटील,मधुकर पाटील, शिवा पाटील, संजय पाटील, तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, आदिंसह मान्यवर उपस्थित होते. अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.सौ.वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी शेतकरी गीते सादर केली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला बळीराजा प्रवेशद्वार नामकरण केल्याबद्दल सभापती अशोक पाटील,संचालक सुभाष पाटील, गटसचिव संघटनेचे विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
महात्मा बळीराजा गौरव मिरवणुक जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुढापा मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने तसेच पुरोगामी विचाराच्या विविध संघटनांच्या मार्गदर्शनाने ही मिरवणूक एक तपाहून जास्त कालावधीपासून परंपरागत सुरू आहे. बळीराजा गौरव मिरवणुकीत जिजाऊ ब्रिगेडच्या वैशाली शेवाळे, आरती पाटील, प्रतिभा पाटील, सौ. शैलजा शिंदे यांचेसह अशोक पाटील, प्रेमराज पवार, डी.ए. पाटील, डॉ विलास पाटील, प्रा.स्वप्निल पवार, अजिंक्य चिखलोदकर, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बळीराजा मिरवणूक शिरूड नाका परिसर, बडगुजर मंगल कार्यालय, वड चौक, त्रिकोणी बगीचा, बस स्थानक मार्गे,धुळे रोड विश्राम गृह मार्गे या मिरवणुकीचा समारोप बळीराजा स्मारकाजवळ करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते मनोहर पाटील, डॉ.कुणाल पवार, डी.डी. पाटील, सयाजीराव पाटील, इंजिनीयर प्रशांत निकम, श्रीकांत चिखलोदकर, जयवंतराव पाटील,महेश पाटील, प्रा.प्रदिप पवार, एस.एम.पाटील,राजेंद्र पाटील,नरेंद्र अहिरराव, संजय कुंभार, विजय पाटील,नरेंद्र पाटील आदीने बळीराजाचे पुष्प अर्पण करून पूजन केले. याप्रसंगी बैलगाडी चालक शेतकऱ्यांचा तसेच बळीराजाचा पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या अजिंक्य श्याम पाटील याचा सत्कार करण्यात आला.
मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मधू पाटील,गुलाब पाटील, दत्तू पाटील, दिलीप कोळी, उमेश शेटे,कुंदन पाटील, विकास पाटील, वाल्हे सर, बापू मिस्त्री, प्रदिप पाटील,नवल पाटील, संजय पाटकरी,भटू पाटील, रवी पाटील,अमोल पाटील आदींसह युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.