साधुसंतांसह विविध देवतांना ७०० पदार्थांचा नैवेद्य अर्पण…
अमळनेर:- येथील बीएपीएस स्वामींनानारायण मंदिरात दिवाळीनिमित्त मंगळवारी अन्नकुट महोत्सवात भगवान स्वामीनारायण तसेच गुरुपरंपरेतील साधुसंतांसह विविध देवतांना 700 पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
मंदिरातील गर्भगृहात तसेच विविध देवतांच्या मूर्तीसमोर अन्नपदार्थ, ज्यूस, आईस्क्रीम चॉकलेट्स, मिठाई सर्व प्रकारच्या भाजा भगवंताचा अर्पण करण्यात आले. दिवसभरात शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी १२ वाजता गोवर्धन पूजा पूज्य योगी स्नेहस्वामी यांनी केली, पुज्य उत्तममुनी स्वामी यांनी शांती पाठ केला यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भगवंताची आरती झाली.दरम्यान नूतन वर्षाच्या प्रारंभी स्वामीनारायण मंदिरात देवाला स्वादिष्ट पक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो त्याला अन्नकुट उत्सव म्हणतात, मंदिरास विद्युत रोशनाईने सजविण्यात आले होते, भव्य रांगोळीही घालण्यात आली होती, या अन्नकोट महोत्सवाला प्रवीण सोनी, बजरंगलाल अग्रवाल, हरिकृष्ण सोनी, प्रीतम मणियार, अतुल सोनी, जितू अग्रवाल,चंद्रकांत लोहार, नीरज अग्रवाल, अमरीश अग्रवाल, चंद्रकांत वाघ, चंद्रकांत वाणी, रोहित बोढरे, आदित्य सोनवणे, पंकज महाजन, मनीष पाटील, अमोल अमृतकर, योगेश मकवाना, प्रशांत वाणी, धीरज अग्रवाल, विशाल चौधरी, विशाल भोसले, किरण लोहार, राजेंद्र देशपांडे,मयूर ठाकूर, मनोज देशमुख,योगेश चौधरी, सर्व पान खिडकीतील मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ, युवती आणि बालिका मंडळ व पत्रकार चेतन राजपुत यांनी सहकार्य केले.तसेच या अन्नकुट महोत्सवप्रसंगी भगवंतासमोर चेतन चौधरी, अमोल बाविस्कर, किशोर सोनी, ओमप्रकाश सूर्यवंशी, जगदीश चौधरी यांनी अन्नकुट विषयाचे भगवंताचे थाळ-गाणं केले सूत्रसंचालन शामकांत बागल यांनी केले, सुमारे दोन हजार जणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.