अमळनेर:- येथील डीवायएसपी यांच्या पथकाने पारोळा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली आहे.
पारोळा येथून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हितेश बेहरे, गणेश पाटील, प्रमोद बागडे याना कारवाईसाठी रवाना केले. १८ रोजी सकाळी पारोळा कजगाव रोडवर तांबेनगर जवळ डंपर क्रमांक एमएच ४६ बीएफ ५९६४ मध्ये अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आले. चालक कैलास संतोष मोरे (वय ४४ रा सरकारी दवाखान्याजवळ आडगाव ता एरंडोल) याने वाळूचा परवाना नसून डंपर मालक रवींद्र भगवान पाटील रा (भडगाव पेठ भडगाव) हे असल्याचे सांगितले. पथकाने वाळूसह डंपर पारोळा पोलीस स्टेशनला जमा केले असून तहसीलदारांना पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
Related Stories
December 22, 2024