अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे दिनांक १७ रोजी एका व्यक्तीवर हिंस्त्र प्राण्याने एकावर रात्री 1 वाजेच्या सुमारास हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील कळमसरे येथील ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन यांच्या शेतात विट पाडण्याचा कामासाठी सावदा येथील बाळा पंडित कुंभार दरवर्षी व्यवसायानिमित्त येतात. यावर्षी दिवाळीत आपल्या कामासाठी कळमसरे येथे आलेले आहेत. घराची साफसफाईची कामे करत होते. रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात प्राण्याने घुसत त्यांच्यावर व त्यांच्या मुलांवर हल्ला केला. अचानक झोपेच्या अवस्थेत झालेल्या हल्ल्यात ते खूप घाबरून गेले. अशा परिस्थितीत बाळा कुंभार आपल्या मुलाबाळांचे संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. प्राण्याचा हल्ला परतवून लावण्यात ते यशस्वी झालेत व प्राण्याने पळ काढला. अज्ञात हल्ल्यापासून त्यांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठेवले परंतु या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत त्यांनी लागलीच मारवड आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले असता प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविले. बाळा कुंभार याची प्रकृती स्थिर असून या घटनेमुळे कळमसरे सह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी शेतकरी व मजूर वर्गाने सावधानता बाळगावी याविषयी सूचना देण्यात आलेली आहे.
Related Stories
December 22, 2024