अमळनेर:- तालुक्यात समाजसेवेच्या नावाखाली आपल्या व्यवसायाची वृध्दी कशी होईल ? तसेच ओळखी वाढवून वेगवेगळ्या व्यवसायात फायदा कसा होईल हे गोरख धंदे करणारी विखारी पिल्ले फोफावत असून अश्या प्रवृत्तींच्या महत्त्वाकांक्षा ओळखून त्यांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्यात.
आपण खूप मोठी समाजसेवा करतो याचा आव आणून सोशल मीडियावर त्याबाबत फोटो पसरवून आपण किती महान कार्य करतो याची स्तुती स्वतःच्या तोंडाने करत अनेकांना प्रसिद्धीचा हव्यास लावत स्वतःचा फायदा करून घेणारी मन्याभाई वृत्ती शहरात फोफावत आहे. ही समाजसेवा करण्यामागची कारणे सहा आठ महिन्यात व्यवसायाने उघड झाली. समाजातील विविध घटकांशी ओळखी करून घेत मन्याने आपल्या व्यवसायाचा पाया या माध्यमातून घातला. सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करत तरुणांना प्रसिद्धीचे आमिष दाखवत मण्याने गोतावळा जमवला आहे. शहरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रकरणावरून तरुणांची माथी भडकावून त्यांना दगडे मारायला लावून स्वतःला नामनिराला ठेवणाऱ्या मण्याची वृत्ती अनेकांच्या लक्षात आली आहे. आपला व्यवसाय कसा वाढत आहे हे लोकांच्या नजरेत आणून देत प्रत्येक कार्यक्रमास बिन बुलाये बाराती सारखी हजेरी लावत आपले फोटो सोशल मीडियावर टाकत मोठ्या हस्तींसोबत आपली उठबस असल्याचे मण्या भासवत असतो. या सोशल मीडियावर समाजाच्या नजरेत शाव बनून राहणाऱ्या व हळूहळू आपल्या विषारी वृत्ती फैलावणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच लक्षात घेवून नांग्या ठेचायला हव्यात. अन्यथा अनेकांच्या माथी भडकावून स्वतःचा फायदा करणारी वृत्ती शहरात अनेकांच्या गचांड्यापर्यंत आल्या शिवाय राहणार नाही.