सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील रहिवासी असलेला गौरव पवार (राशी सीड्स प्रतिनिधी) या तरुणाचे नुकतेच वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी घरांची जबाबदारी पार पाडत असताना मागील महिन्यात अज्ञात वाहनांच्या धडकेने सावखेडा गावाशेजारी रोडवर अपघातात निधन झाले होते. त्याच्या वडिलांचेही त्याच्या लहानपणीच निधन झाले असल्याने त्याची आई पतीच्या विरहाचे दुःख विसरत असतानाच त्याला ही देवाने हिरावुन नेले. घरातील कमावता मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर मोलमजुरीची वेळ आली याच गोष्टीचा विचार करत अमळनेर तालुक्यातील सीड्स कंपनी प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून एक कै गौरव पवार मित्र परिवार हा ग्रुप तयार करून जिल्हाभरातील सर्व कृषी कंपनी प्रतिनिधी, कृषी केन्द्र धारकांना या ग्रुपच्या व्हाट्सएपच्या माध्यमातून मदतीचे आव्हान करण्यात आले.
अश्या वेळी अमळनेर सीड्स असोशिएशन, अमळनेर तालुका कंपनी प्रतिनिधी, पारोळा तालुका कंपनी प्रतिनिधी, धरणगाव कंपनी प्रतिनिधी, चोपडा कंपनी प्रतिनिधी, जळगांव कंपनी प्रतिनिधी, पाचोरा कंपनी प्रतिनिधी धरणगाव सीड्स असो, पारोळा सीड्स असो. यांनी पुढाकार घेत ही मदत रक्कम रु.२,०१,००० (दोन लाख एक हजार रुपये) एवढी जमा झाली ही रक्कम दि.२६ जानेवारी रोजी दुपारी कै. गौरव पवार यांच्या पातोंडा येथे गावी जाऊन त्याच्या परिवारातील सदस्य त्याची आई ग.भा.कविता पवार,भाऊ मयूर पवार, आजोबा रमेश पवार, काका रविंद्र पवार, स्वप्नील पवार यांना रु.२,०१,००० रकमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला यावेळी अमळनेर कंपनी प्रतिनिधी प्रशांत भदाणे, पांडुरंग कोळी, राहुल धनगर, पंकज पाटील, गणेश मराठे, प्रमोद पाटील, आनंद सोनवणे, गणेश कुंवर, पारोळा कंपनी प्रतिनिधी समाधान पाटील, लक्षमण पाटील, दिलीप पाटील, अनिल पाटील, राकेश पाटील, चोपडा कंपनी प्रतिनिधी महेंद्र बाविस्कर, भूषण निकम,जळगांव कंपनी प्रतिनिधी सुनील मुळे, अमोल विचुरकर ,धरणगाव कंपनी प्रतिनिधी गोविंदा पाटील,अमोल पाटील, पाचोरा कंपनी प्रतिनिधी हेमंत राठोड तसेच अमळनेर सीड्स ,पेस्टीं असो.योगेश पवार, किरण पाटील, दीपक पाटील, मगन पाटील, सचिन पाटील, महेंद्र पाटील, बाळासाहेब पवार, संदीप पाटील आदी उपस्थित होते.