अमळनेर : येथील दिनेश बागडे पुणे येथे झालेल्या चवथ्या राज्यस्तरीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १०५ किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले आहे.
दिनेश बागडे याची १६ ते १८ जानेवारी २०२६ रोजी उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनेश याने यापूर्वी २०२५ मध्ये झालेल्या खेलो इंडियाच्या पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. तर २०२४ च्या खेलो इंडिया स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल अमळनेर येथील क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.

