
अमळनेर(प्रतिनिधी):- शहरातील वर्धमान नगर भागातील एका घरातून ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गलवाडे रस्त्यावरील वर्धमान नगर भागात आनंद पिरन शिरसाठ हे आपल्या कुटुंबासह राहतात.१६ रोजी सायंकाळी ४ वाजता ते आपल्या पत्नीसह पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणी सार्वे (ता.पाचोरा) येथे त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी गेले होते.
९ रोजी आनंद शिरसाठ यांच्या शेजाऱ्याचा त्यांना फोन आला की तुमच्या दरवाजाचे कडी,कुलूप तुटलेले आहे.१० रोजी आनंद शिरसाठ घरी आले असता त्यांच्या बेडरूम मधील कपाटातून ४० हजारांचे सोन्याचे दागिने तर ३० हजारांची रोकड असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजले.अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.विनोद सोनवणे करत आहेत.
