
अमळनेर:- काल चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला असून यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजय झाल्याने अमळनेर भाजपातर्फे जल्लोष करण्यात आला.
महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी आ. स्मिता वाघ, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

