अमळनेर:- तालुक्यात काल ६ कोरोना बाधीत आढळले असून कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असले तिसऱ्या लाटेत अद्याप तालुक्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.
आरटीपीसीआर चाचण्यात ४ तर अँटीजेन चाचण्यात २ असे एकूण ६ बाधीत आढळून आले आहेत. यापैकी ४ शहरातील व २ ग्रामीण भागात असून त्यामुळे शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.