अमळनेर:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोकरबारी ता पारोळा येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावात साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेर पंचायत समिती पारोळा,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जळगाव, ग्रामपंचायत भोकरबारी यांचे संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी रोजी सकाळी जल जीवन मिशन, योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सामूहिक पाणी बचत व जल प्रतिज्ञा सर्व ग्रामस्थांना देण्यात आली. प्रतिज्ञेचे वाचन मुळे मॅडम यांनी केले. 10 टक्के लोकवर्गणीतून पाणी पुरवठा योजनेबाबत माहिती देण्यात आली, सांड पाणी व घनकचरा संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमला सरपंच राहुल तुकाराम पाटील, उपसरपंच पूनम विश्वास गव्हाणे, ग्रामसेवक प्रवीण बापू अमृतकर, तलाठी योगेश बैसाने,सदस्य दीपक पाटील,युवराज सोनवणे, यशोदा पाटील, रंजनाबाई पाटील, मंगलबाई पाटील, शिक्षक व ग्रामस्थ तसेच साने गुरुजी फौंडेशनचे कार्यकते जगदिश पाटील,पवन साळुंखे, उपस्थित होते,