
अमळनेर:- शहरातील डॉ. बी. एस. पाटील ताडेपुरा आश्रमशाळेत काल खा. शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, राष्ट्रवादीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी जि. प. सदस्य शिवाजी नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष रफिक शेख, सरचिटणीस मुशीर शेख, धारचे माधव आबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. बी. एस. पाटलांनी पवार साहेबाचा एखादा तरी गुण आत्मसात करावा, असे शिक्षकाना आवाहन केले. तिलोत्तमा पाटील यांनी साहेबाच्या कार्याचा उल्लेख करत गौरव केला. सोनवणे यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाकीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

