मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालयाने राबविला विविधांगी उपक्रम…
अमळनेर:- जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने येथील मंगळग्रह मंदिर परिसरात मंगळवारी पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चलचित्रफीत, चालता बोलता आदी एड्स जनजागृतीपर विविधांगी उपक्रम राबवून जनतेचे उद्बोधन करण्यात आले. याप्रसंगी एचआयव्ही व कावीळ तपासणीही करण्यात आली.
धार्मिकसह सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे नेहमीच समाजाभिमूख उपक्रम राबविले जातात. जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने मंगळग्रह मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहता १२ रोजी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पं. जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तसेच याठिकाणी पोस्टर, चलचित्रफीत, चालता बोलता आदी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच इच्छुक भाविकांची एचआयव्ही व कावीळ तपासणी देखील करण्यात आली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी आनंद महाले, अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शिंदे, आयसीटीसी समुपदेशक अश्वमेध पाटील, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, आयसीटीसी समुपदेशक दीपक शेलार, एआरटी समुपदेशक जयेश मोरे, साई सेवा हॉस्पिटल खैरनार लॅबोरेटरीचे संचालक उदयकुमार खैरनार, महालक्ष्मी लॅबोरेटरीचे संजय मुसळे, नर्मदा मेडिकल फाउंडेशन लॅबोरेटरीचे मनोज सूर्यवंशी, सूर्यवंशी लॅबचे किशोर सूर्यवंशी, दुर्गा हॉस्पिटल लॅबचे किशोर महाजन, नाविन्य लॅबचे शरद शेवाळे, स्वयंसेवक राकेश महाले, मुरली बिरारी, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. अस्मिता खेडकर आदी उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त व सेवेकरी, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी वृंद, व एआरटी, आयसीटीसी विभाग कर्मचारी वृंद, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील, साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले.