जयंतीनिमित्त प्रा. नितीन पाटील यांचे व्याख्यान संपन्न…
अमळनेर : येथील प्रताप स्वायत्त महाविद्यालयात दि. ११ डिसेंबर रोजी खान्देश शिक्षण मंडळाचे संस्थापक श्रीमंत प्रताप शेठजी यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रताप शेठजी यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रा. नितीन पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी शेठजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले.
यावेळी अमळनेरचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती. महादेव खेडकर यांनीही प्रताप शेठजींच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ अरुण जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी.एच. निकुंभ, प्रा.डॉ. कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा.डॉ. विजय मांटे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यु.जी.मोरे, विविध विभागातील विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.