अमळनेर:- रस्त्यावर जाताना सापडलेला मोबाईल मारवड पोलिसांच्या माध्यमातून मुळ मालकास केल्याने लोण पंचम येथील पोलिस पाटील यांचे कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यातील लोण पंचम येथील पोलिस पाटील उमेश पाटील आणि त्यांचे शालक किशोर लक्ष्मण पाटील (रा.चौगाव ता.शिंदखेडा) हे काल दुपारी प्रवासातुन परत येत असतांना रस्त्यात मोबाईल सापडला. मोबाईल स्विच ऑफ असल्याने घरी येवून चार्ज करुन फोन केला असता तो मांडळ येथील शेखर पाटील यांचा होता. काल मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय शितलकुमार नाईक यांच्या माध्यमातून मूळ मालक शेखर पाटील यांना परत केला. शेखर पाटील यांनी पो.पा. उमेश पाटील यांचे आभार मानले. एपीआय नाईक यांनी सर्व पोलीस पाटलांचे कौतुक केले.
Related Stories
December 22, 2024