अमळनेर:- गुजरात येथे झालेल्या ग्रे लाईन क्लासिक इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अमळनेरच्या आर्यन बारस्कर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वडोदरा येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ६० किलो वजनाच्या गटात आर्यनने यश मिळवले आहे. त्याला न्यूयॉर्क चे मिस्टर वर्ल्ड ब्रँको टीओडोरोविक व मिस्टर वर्ल्ड अनुजकुमार , किन्नर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. आर्यन बारस्कर याच्या यशाबद्दल अमळनेर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, महेश माळी, निलेश विसपुते, प्रा अमृत अग्रवाल, जयेश म्हासरे, मयूर बारस्कर यांनी अभिनंदन केले आहे.
Related Stories
December 22, 2024