शहरातून काढली गुन्हेगारांची वरात…
अमळनेर:- शहरातील सराईत गुन्हेगार शिवम देशमुख यास त्याच्या एका साथीदारासह अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशन येथे 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. दाऊद मनोज देशमुख याने त्याचे साथीदारांसह दि. 01/11/2021 रोजी अमळनेर शहरातील श्री बालाजी स्टीलजवळ रोडवर एका इसमाला दमदाटी, मारहाण करुन त्याच्याकडुन बळजबरीने पैसे हिसकावुन घेतल्याने आरोपी शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख व त्याचे साथीदाराविरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तेव्हापासुन तो फरार होता . तसेच दि. 10/12/2021 रोजी चाळीसगांव शहरात त्याचे इतर आठ साथीदारांसह एका इसमास मारहाण करुन दरोडा टाकल्याने चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन भादंवि कलम 397, 427 प्रमाणे दाखल गुन्ह्यात तो फरार आहे . दि. 02/02/2022 रोजी जिवनतारा हॉस्पीटल समोर संविधान चौक, अमळनेर येथे एका इसमास दमदाटी करुन त्याच्याकडुन बळजबरीने पैसे काढुन घेतले वरुन अमळनेर पोलीस स्टेशन येथे त्याचेविरुध्द भादंवि कलम 392 प्रमाणे गुन्हा नोंद आहे . तसेच दि . 02/ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 07.30 वाजता आरोपी शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा अमळनेर शहरात आल्याची पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांचेसोबत पोहेकों सुनिल हटकर, पोना दिपक माळी, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे, पोना रविंद्र पाटील , पोकॉ अमोल पाटील, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ गणेश पाटील, पोकॉ रोहीदास आगोणे , पोकॉ सागर साळुंखे यांचे तीन पथक तयार केले तेव्हा शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा गलवाडे रोड प्रताप मिल कंपाऊंड येथे त्याची पत्नी व सासुकडे आल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरून त्यास पोलीस पथक पकडण्यास गेले असता , त्याने पोलीसांना पाहुन पळ काढुन भिंतीवरुन उडी मारली. तो भिंतीवरुन खाली पडला त्यात त्याला पायाला दुखापत झाली तरी सुध्दा तो पळुन जात असतांना पोकॉ रोहीदास आगोणे, पोकॉ सागर साळुंखे यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे यांनीही त्यास पकडण्यास मदत केली. तसेच सदर गुन्ह्यातील त्याचा साथीदार राहुल किशोर वानखेडे रा. लोण चारम ता. अमळनेर यास त्याचे राहते घरातुन दुसऱ्या पथकातील पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील , पोकॉ अमोल पाटील, पोकॉ राहुल पाटील यांनी ताब्यात घेतले. शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा सराईत गुन्हेगार असुन तो यापुर्वी 2018 मध्ये पोलीसांना हुल देवुन पळुन गेला होता. तो धोकादायक असल्याने न्यायालयाकडुन त्यास हातकड़ी लावण्याची परवानगी घेतली. शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा अमळनेर शहरात स्वताला अमळनेरचा दाऊद समजतो व अमळनेर शहरातील व्यापा – याकडुन व नागरीकांकडुन बळजबरीने पैसे घेवुन जनतेच्या मनात दहशतीचे वातावरण पसरवितो. त्याची दहशत असल्याने सामान्य नागरीक व व्यापारी त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देत नाहीत. जनतेच्या मनातील त्याच्याबद्दल भितीचे वातावरण कमी करण्याच्या उद्देशाने त्यास अमळनेर कोर्ट ते छत्रपती शाहु महाराज चौक असे पायी चालवत नेवुन शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख याचे बद्दल अमळनेर शहरातील लोकांनी भिती न बाळगता त्याने गुन्हा केला असल्यास त्याचेविरुध्द तक्रार द्यावी असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने जनतेला करण्यात येत आहे.