अमळनेर:- दगड का मारला विचारल्याचा राग येवून दोघांनी लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना मांडळ येथे घडली आहे.
रामचंद्र आनंदा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुकेश रघुनाथ कोळी व राकेश रघुनाथ कोळी हे दोन्ही भांडण करत असताना फिर्यादीच्या घराच्या दिशेने दगड भिरकावला. याचा जाब विचारला असता दोघांनी दारूच्या नशेत फिर्यादी व त्याची पत्नी यांना लाकडी काठ्यांनी मारहाण करत दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना भरत गायकवाड हे करीत आहेत.