शाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. लहान गटात प्रथम क्रमांक दिव्यानी शिंदे, द्वितीय क्रमांक गायत्री बडगुजर, तृतीय बक्षीस मयुरेश पाटील, उत्तेजनार्थ बक्षीस मनस्वी पाटील यांना देण्यात आले. मोठ्या गटात प्रथम क्रमांक मृणाली साळुंखे, जान्हवी साळुंखे यांना विभागून देण्यात आले.तृतीय क्रमांक कल्पेश चव्हाण व उत्तेजनार्थ बक्षीस दिव्या पाटील यांना देण्यात आले. यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यासाठी पोलीस निरीक्षक तुषार साळुंखे व ग्रामपंचायत सदस्य सचिन साळुंखे यांचे सहकार्य लाभले. बक्षीस देणाऱ्या दात्यांचे आभार शाळेकडून व्यक्त करण्यात आले. तसेच कैलास लोहार यांनी पुढील कार्यक्रमासाठी 1051 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली पाटील यांनी केले.प्रास्तविक आणि आभार दिनेश मोरे यांनी मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.