
मराठा समाजातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार संपन्न..
अमळनेर:- जगात सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे आपले चारित्र्य , ते सांभाळा. जिजाऊ जगातली आदर्श आई झाली आपण घरातली आदर्श आई झालो तरी मुलींवर संस्कार चांगले होतील, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या विधितज्ञ ऍड वैशाली डोळस यांनी मराठा मंगल कार्यलयात महिलांना मार्गदर्शन करताना केले.
मराठा समाज व जिजाऊ जन्मोत्सव महिला समितीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि ‛जिजाऊ आणि आजची तरुणी’ याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील होते. ॲड डोळस पुढे म्हणाल्या की, मुली अरेंज मॅरेज करतात तेव्हा त्यांना पगार, शेती, घर, गाडीची अपेक्षा असते आणि लव मॅरेज करते तेव्हा तिला गवंडी ही चालतो. यासाठी मुलींवर संस्कार घडणे गरजेचे आहे. मोठी माणसे उगीच घडत नसतात त्यासाठी महानायकांची पुस्तके वाचा अभ्यास करा. या देशाच्या व्यवस्थेने पुरुषाला माणूस म्हणून तर स्त्री ला वस्तू म्हणून स्वीकारले आहे. व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवे, तिलोत्तमा पाटील, राजश्री पाटील, स्वप्ना पाटील, डॉ विद्या पाटील हजर होते. यावेळी सीमा रगडे, सलमांबानो मोहम्मद शफी तेली, रंजना महाजन, दीपिका सोनवणे, शीतल ठाकूर, भारती पाटील, सुनीता वाघ, सोनी रॉय, नीलिमा जाधव, गुजराथी महिला मंडळ, उज्वला पाटील, रंजना देशमुख, ज्योती भावसार, प्रेमलता पाटील, स्वाती नरेश, प्रियदर्शनी भोसले, आदिती पाटील, स्नेहल शिसोदे, ज्योत्स्ना लोहार या महिलांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका गायत्री भदाणे, सूत्रसंचालन सविता अहिरे, मोनिका पाटील यांनी तर आभार शीतल सावंत यांनी मानले. कार्यक्रमास सचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष संजय पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, चंद्रकांत काटे, स्वप्नील पाटील,मनोहर पाटील, संजय पुनाजी पाटील, भूषण भदाणे, संजय सोनवणे यांच्यासह तालुक्यातील महिला हजर होत्या.

