अमळनेर:- २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काल रात्री अमळनेर शहरातील संवेदनशील एरियात पोलिसांचा रूट मार्च काढून पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश देण्यात आला.
रात्री ८ वाजता दगडी दरवाजा येथून रूट मार्चला सुरुवात झाली यात प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सुराणा,डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे आदीसह चार दुय्यम पोलीस अधिकारी,40 पोलीस कर्मचारी व 10 होमगार्ड सहभागी झाले होते.सदर रूटमार्च सराफ बाजार,वाडी चौक,माळीवाडा येथून झामी चौक परिसरात पोहोचून तेथे समारोप करण्यात आला.