अनेकांचा सहभाग,बोरी पात्रासह वाडी मंदिर परिसर केला स्वच्छ…
अमळनेर:- येथील नगर परिषदेच्या वतीने दि २१ रोजी शहरातील बोरी नदी पात्र व वाडी मंदिर परिसरात महास्वच्छता अभियान व स्वच्छ तीर्थ अभियान मोहीम पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
या महास्वच्छता अभियानात शहरातील नागरिक, पत्रकार, सेवाभावी संस्था आदींना सहभागी होण्याचे आवाहन नगरपालिकेने केले होते.त्यानुसार माजी आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी नगरसेवक संजय पाटील, सुरेश पाटील, जयदीप पवार, तुषार कासार, सूरज सराफ,निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, हैबतराव पाटील, सोमचंद संदानशिव यासह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत, उपाध्यक्ष आर जे पाटील, हिरालाल पाटील, राहुल बहीरम, अनिल पाटील यासह सामाजिक कार्यकर्ते,नागरिक व पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.महिला हाउसिंग ट्रस्टच्या सदस्याही यावेळी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी माझी वसुंधरा अभियानाची सामूहिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर बोरी पात्र, समाधी मंदिर, वाडी मंदिर व चौक परिसर या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कामगार यांनी बोरी नदी पात्रातील कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावली.संत सखाराम महाराज समाधी मंदिराला पाण्याने स्वच्छ करण्यात आले.पालिकेचे सर्व अधिकारी व नगर पालिका कर्मचारी यांचीही यावेळी उपस्थिती होती.