ना.अनिल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून लाभार्थ्यांना मदत…
अमळनेर:- मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील ३५४ दिव्यांग बांधवांना २० लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले.माजी आमदार स्मिता वाघ व माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर १९ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ,माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील,माजी नगरसेवक प्रा.अशोक पवार,सामाजिक कार्यकर्ते देविदास देसले,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, दिव्यांग संघटनेचे बिरजू चौधरी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ना.अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रालयातूनच भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी चर्चा केली. यावेळी दिव्यांगांना तीनचाकी सायकल, व्हील चेअर, कर्णयंत्र,कुबड्या, अंधकाठी, वॉकर,इलेक्ट्रिक काठी जयपूर कृत्रिम पाय तसेच इतर २५ प्रकारची उपकरणे वाटप करण्यात आली.यावेळी दिव्यांग जिल्हा पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सी.पी.गणेशकर यांनी प्रास्ताविकातून दिव्यांगांच्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांवर चर्चा केली.
यावेळी मार्केटचे सभापती अशोक पाटील,संचालक समाधान धनगर,भाईदास भिल, विजय पाटील, व्ही.आर. पाटील, भिकेश पाटील,प्रवीण पाटील, मुक्तार खाटीक,रणजित पाटील, महेंद्र बोरसे,प्रा.सुरेश पाटील, तारकेश्वर गांगुर्डे,पंकज साळी, उमाकांत साळुंखे,जयंतलाल वानखेडे, संजय पाटील,प्रताप शिंपी, दीपक पाटील,अमोल पाटील, करीम बागवान,सुनील शिंपी, नीलेश पाटील,निलेश देशमुख, राहुल गोत्राल,भूषण पाटील,प्रदीप पाटील,निनाद शिसोदे, शोएब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य मिळाल्यामुळे त्यांनी ना. अनिल पाटील यांचे आभार मानले.सूत्रसंचालन शरद सोनवणे व वसुंधरा लांडगे यांनी केले तर आभार विनोद कदम यांनी मानले.