अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गांव करणखेडा येथे दिनांक 19 ते 25 डिसेंबर दरम्यान सुरू असून आज चौथ्या दिवशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांकडून ग्राम प्रबोधनपर साक्षरता अभियान,जागो ग्राहक जागो अभियान,माझी सुरक्षित वसुंधरा अभियान पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन केले.
गावातील न्यू प्लॉट एरिया ,आदिवासी वस्ती तसेच बाजाराच्या मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी प्रबोधन पर नाटिका सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. या अभियानात ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा . डॉ. हेमंत पवार यांनी जागो ग्राहक जागो या विषयावर विद्यार्थी व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. दुसरे वक्ते म्हणून धनदाई महाविद्यालय अमळनेर येथील संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. महादेव तोंडे यांनी माझी वसुंधरा या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. अध्यक्षस्थानी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे होत्या. अतिथींचा परिचय कु.कोमल पाटील करून दिला.शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ .किशोर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण हिने केले.